Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting Saamtv
महाराष्ट्र

Cabinet Meeting: मंत्रीमंडळ बैठकीतून मराठवाड्याला मोठं गिफ्ट; मुख्यमंत्र्यांकडून ४५ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा

Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली..

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाच्या घोषणा केल्या.

काय म्हणाले मुख्यंत्री..?

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाड्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी ही बैठक झाल्याचे सांगत मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठीचे अनेक निर्णय बैठकीमध्ये घेतल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या घोषणा....

बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंचन प्रकल्पावर १४ हजार कोटी खर्च करणार असल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकामासाठी 12 हजार 938 कोटी, ग्रामविकाससाठी 1 हजार 191कोटी, कृषीविभागासाठी 709 कोटी, तसेच वैद्यकीय विभागासाठी 498 कोटी खर्च करणार असल्याची घोषणा केली. आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही अधिकृत नावे केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विरोधकांवर टीका...

बैठकीच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ही बैठक होऊ नये यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला, जो स्वतः काहीच काहीच करीत नाही, ते केवळ नाव ठेवायचं काम करतात.. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT