Raosaheb Danve Kicks BJP Party Worker: Saam Tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve: फोटोत येतो म्हणून मित्राला मारली लाथ, रावसाहेब दानवेंचा VIDEO व्हायरल; विरोधक आक्रमक

Raosaheb Danve Kicks BJP Party Worker: मित्राला फोटोपासून दूर ठेवण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याच मित्राला मिश्किलपणे लाथ मारली. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

माजी मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे सध्या चर्चेत आले असून त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मोडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील रावसाहेब दानवे यांचे कृत पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवे हे एका सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून विरोधक दानवेंवर सडकून टीका करताना दिसत आहेत.

मित्राला फोटोपासून दूर ठेवण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याच मित्राला मिश्किलपणे लाथ मारली. रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या भेटीदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या भेटीदरम्यान रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना बुके दिला.

यावेळी फोटोग्राफर त्यांचा फोटो काढत होता. त्यावेळी रावसाहेब दानवे यांचा कार्यकर्ता आणि मित्र फोटोमध्ये आला. यावेळी त्यांनी लाथ मारून त्यांना बाजूला केले. नेहमी नेहमी फोटो येतो म्हणून दानवे यांनी त्याला दूर सारल्याचे सांगितले जात आहे. शेख हमद असे रावसाहेब दानवे यांच्या मित्राचे नाव आहे. दानवे यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या या व्हिडीओवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या आहेत. 'सत्ता या लोकांच्या डोक्यात गेली आहे. यांना सत्तेचा माज आला असेल तर जनता यांना लाथाडल्या शिवाय राहणार नाही.' अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या कृत्यामुळे नेटकरी देखील संतप्त झाले आहेत. त्यांनी देखील व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत दानवेच्या कृतीचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT