bjp politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

Political Battle Intensifies in Rahuri: राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत भाजपने अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली. आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय हालचालींना वेग

  • भाजपकडून अक्षय कर्डिले उमेदवार

  • प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढवणार

  • काँग्रेसच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

सुशिल बनसोडे, अहिल्यानगर

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. या निवडणुकीसाठी भाजपने शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली. तर आता त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस पक्षाने देखील राहुरीची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले दिले आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात प्राजक्त तनपुरे उतरणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हिंदुत्वाची भूमिका घेऊन मतदारसंघात त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढल्यास मतदानावर परिणाम होण्याची भीती आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला होता. राष्ट्रवादीमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याला अडचण होण्याची शक्यता असल्याने प्राजक्त तनपुरे अपक्ष पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तनपुरेंनी उमेदवारी अर्ज नेला. अर्ज नेताना त्यांनी अपक्ष नोंद केली. प्राजक्त तनपूरे यांच्याकडून गावोगावी संपर्क दौऱ्याचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने राहुरीची निवडणूक लढण्याचे संकेत दिले असले तरी ग्राउंड लेव्हलवर त्यांची अद्याप काहीही तयारी दिसत नाही.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या निवडणुकीत जोरदार एन्ट्री केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीत योग्य वेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्ता तनपुरे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या चर्चांनी समीकरणे आणखी गुंतागुंतीची केली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी प्राजक्त तनपुरे संपर्कात नसल्याचे सांगत थेट भाष्य करणं टाळले. त्यामुळे काँग्रेसचा पुढील निर्णय काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुरीतील ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून आघाडीतील एकजूट की अंतर्गत मतभेद याचीही खरी कसोटी ठरणार आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या लढतीचे खरे चित्र समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

SCROLL FOR NEXT