Rajgurunagar municipal election controversy over alleged ₹1 crore bidding for a councillor seat. Saam Tv
महाराष्ट्र

1 कोटीत मिळणार नगरसेवकपद? कुठे लागली नगरसेवकपदाची बोली?

Pune Municipal Election Unopposed Seat Bidding: नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान नगरसेवकपदाचा घोडेबाजार सुरु आहे... हा घोडेबाजार नेमका कुठं सुरु आहे.... नगरसेवकपदासाठी किती कोटींची बोली लावण्यात आलीय...

Omkar Sonawane

नगरसेवकपद विकणे आहे..ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना... मात्र नगरसेवकपदासाठी तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागल्याचं समोर आलंय... पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बोली लावण्यात आलीय..

मात्र लिलावात नेमकं काय घडलं?

सर्वसाधारण जागेसाठीची बोली 90 लाखांपर्यंत गेली

त्यानंतर रिंगणात 3 उमेदवार शिल्लक राहिले

बोली 97 लाखांवर गेल्यावर आणखी एका उमेदवाराने माघार घेतली

अखेर 1 कोटी 3 लाखांवर लिलाव पक्का झाला

अशीच बोली महिला राखीव पदासाठी लावण्यात आली.. मात्र ही बोली 22 लाखांवर निश्चित झाली

आता गावकऱी या लिलावातून जमलेली रक्कम गावच्या विकासासाठी वापरणार असल्याचं म्हटलं जातंय... मात्र कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवकपद विकण्याचा पायंडा पडला तर आगामी काळात आमदारकी आणि खासदारपदही असंच विकलं जाईल... मग पैसे घेऊन निवडणुका झाल्या तर बिनविरोध होणार असतील तर हा लोकांच्या मतदानाच्या हक्कावरच हल्ला असेल... मग पैशातून पदं विकली गेली तर मतदान तरी करायचं कशाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षानंतर निकाल लागला, पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंना धक्का; कोर्टात नेमकं काय झालं?

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

SCROLL FOR NEXT