Sharayu Motors  Saam Tv
महाराष्ट्र

Baramati News: श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्स कंपनीत पोलिसांकडून सर्च ऑपरेशन, बारामतीत चर्चांना उधाण

Sharayu Motors News: बारामतीमधील शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समजते.

Priya More

लोकसभेप्रमाणेच विधानसभेला बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे काका अजित पवार यांच्याशी होत आहे. नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यावरून अजित पवार यांनी भाषणातून निशाणा साधला. तर शरद पवार यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिले. दरम्यान काल रात्री श्रीनिवास पवार यंच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले.

बारामतीमधील शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे सर्च ऑपरेशन का राबवण्यात आले. त्याचा काय उद्देश होता. त्यातून पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. पण काल रात्री पोलिसांनी शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपेरशन राबवले आहे. त्याला निवडणुकीची किनार असल्याची माहिती समोर येत आहे.

शरयू मोटर्समध्ये चौकशी केली असता काही सापडलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रात्री पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन राबवले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान श्रीनिवास पवार याविषयीची माहिती माध्यमांना देणार असल्याचे समोर येते आहे. मतदानाच्या एक दिवसापूर्वीच या घाडमोडी घडल्याने बारामतीत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

SCROLL FOR NEXT