Cm Devendra Fadnavis And Parth Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! तटकरे- पटेलांनंतर पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?

Parth Pawar Meet CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Priya More
  • पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

  • तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • महायुतीतील समन्वय आणि पक्षातील नाराजीवर चर्चा झाल्याचा दावा

  • बैठकीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू होती. तटकरे आणि पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची अचानक घेतलेल्या भेटीबद्दल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कळवले नव्हते. त्यामुळे पक्षात नाराजी असल्याचं दिसून येत आहे.

तटकरे-पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेल्या भेटीवरून स्वतः सुनेत्रा पवार देखील नाराज होत्या. त्यामुळे महायुतीमध्ये ही नाराजी योग्य नसल्याचे मत पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितलं. यापुढे असं होणार नाही समन्वय साधला जाईल असं मुख्यमंत्र्यांनीही पार्थ पवार यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली. पार्थ पवार यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेकं चाललंय तरी काय? अशा उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cold Or Hot Water : थंड की गरम, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

Maharashtra News Live Update: गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठक यांचा सिलसिला सुरूच

दोन राज्यात बॅलेट पेपरवर निवडणुका; काँग्रेसचा दारुण पराभव! 100 पैकी भाजप+NDA ने किती जागा जिंकल्या?

Home Remedies For Frequent Urination: वारंवार लघवी आल्याचा भास होतोय? लघवीची जळजळ कमी करण्यासाठी करा काकडीचा सोपा उपाय

IAS Transfer: 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT