Ajit Pawar And Jayant Patil News Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil News: ...त्यांच्यामुळे नवे नेतृत्व निर्माण होईल; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

NCP News: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह राज्यभरातील नेते उपस्थित आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी|ता. ३ जानेवारी २०२४

Jayant Patil News:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह राज्यभरातील नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांवरही उत्तर दिले.

काय म्हणाले जयंत पाटील?

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शरद पवार यांच्यावर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांवर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. 'शरद पवारांनी कधीच असं काही केल नाही. सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. त्यामुळे असे आरोप होत आहेत. पक्ष फोडून काही होत नाही त्यामुळे आता आरोप केले जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. तसेच हा केवळ वातावरण निर्मितीचा प्रयत्न आहे..' असा टोलाही त्यांनी लगावला.

रोहित पवार परदेशात..

या शिबिराला रोहित पवारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. यावरही जयंत पाटील यांनी खुलासा केला. "रोहित पवार परदेशात आहेत. शिबिराची तारीख समजल्यावर त्यांनी मला बाहेर जाणार असल्याच सांगितले होते. ते उद्या येण्याचा प्रयत्न करतील. मी गरीब माणूस आहे. माझा कोणाशीही वाद होऊ शकत नाही. पक्षाने दिलेल काम मी करतोय.." अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटावर निशाणा...

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटावरही शेलक्या शब्दात टीका केली. "आमचे सहकारी वेगळ्या विचारासोबत गेले याची खंत आहे. पण ते गेल्यामुळे मागच्या फळीत बसणारे लोक आता पहिल्या रांगेत आलेत. त्यामुळे नवे नेतृत्व निर्माण होईल..." असे जयंत पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT