Rohit Pawar And Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! रोहित पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट, भेटीमागचं कारण काय?

Rohit Pawar And Ajit Patil: रोहित पाटील हे आज सकाळी विजयगड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता रोहित पाटील यांनी आज सकाळी अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पाटील हे आज सकाळी विजयगड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध प्रकारची कामं आणि सदिच्छा भेट म्हणून त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे कारण सांगितले जात आहे. रोहित पवार यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे आता चर्चा होऊ लागली आहे.

तर दुसरीकडे शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी देखील आज अजित पवारांची भेट घेतली. या भेटीआधी सलील देशमुख यांनी सांगितले की, 'अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि मी काही कामांच्यासाठी आलो आहे. त्यांनी वेळ दिला तर भेटू. मी मविआचा उमेदवार होतो. जनतेने दिलेला कौल मी मान्य केला. चर्चा होत असते. पण मला तसं काही होईल असं मला वाटत नाही.

अजित पवार यांच्या नागपूर येथील विजयगड निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. गुलाबी जॅकेट घालून काही कार्यकर्ते अजित पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदेंनी देखील अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर सुहास कांदे यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला. 'भुजबळांचं काही वाईट होतं तेव्हा मला आनंदच होतो. भुजबळांमध्ये एवढी हिंमत नाही की ते पक्ष सोडतील. मी अजित पवारांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.', असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT