Jayant Patil On Dattatray Bharne Saam Tv
महाराष्ट्र

Jayant Patil: भरणेसारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करा, जयंत पाटील यांचं मोठं विधान

Jayant Patil On Dattatray Bharne: हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर तालुक्यातील काटी या गावामध्ये जाहीर सभा झाली. या सभेत जयंत पाटील यांनी दत्तात्रय भरणेंवर टीका केली.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 'भरणे मामासारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने तुम्ही करा.', असे आवाहन जयंत पाटील यांनी इंदापूरमधील जनतेला केले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर तालुक्यातील काटी या गावामध्ये जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला. जयंत पाटील यांनी सांगितले की, 'आमदार दत्तात्रय भरणे हे गद्दार आहेत. त्यांना या विधानसभेला पाडा.' असं आवाहन त्यांनी इंदापूरमध्ये केले.

तसंच, 'येत्या २० तारखेला सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा मुहूर्त आहे. यात गद्दार भरणे यांना पाडा.' असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थित नागरिकांना केले. या सभेमध्ये जयंत पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीवर देखील जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT