Maharashtra Politics Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : बाप-लेकांमध्ये राजकीय आखाडा; दोन्ही राष्ट्रवादीत वडिलांविरोधात मुलांनी ठोकले शड्डू

Vidhan Sabha Election/NCP : नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी आगामी विधानसभेत थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. तर अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातून त्यांचा मुलगा सलील देशमुख निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रणनिती आखलीये. अशातच राज्यात पितापुत्रांमध्येच राजकीय कलह होण्याची शक्यता आहे. एकीकडे दिंडोरीत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी मेळाव्याला हजेरी लावली. त्यामुळे अजितदादांना हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र त्यापेक्षा मोठं म्हणजे गोकुळ झिरवळ यांनी आगामी विधानसभेत थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही काही वेगळं चित्र नाही. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातून त्यांचा मुलगा सलील देशमुख निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभेत देशमुख बाप-लेकातही सामना रंगतो की काय अशी चिन्ह आहेत.

गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे गोकुळ झिरवळ आता विधानसभेत वडिलांविरोधात मैदानात उतरण्यास तयार आहेत. दुसरीकडे सलील देशमुख हे विधानसभेसाठी इच्छूक आहेत.

काही दिवसांपूर्वी सलील देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संजय राऊतांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मोठ्या देशमुखांना संधी मिळणार की छोट्या याबाबत उत्सुकता आहे. पक्षफुटी नंतर मोठ्या प्रमाणात युवा चेहऱ्यांना संधी मिळेल अशी घोषणा शरद पवारांनी केली होती. त्यामुळे दिंडोरी आणि काटोलमध्ये मुलंच निवडणूक लढवणार की बाप-लेकांमध्ये सामना रंगणार याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT