Big Breaking News sharad pawar Group one mla and mp support to ajit pawar maharashtra politics SAAM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं...

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी

Sharad Pawar News:

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची? याबद्दलचा वाद सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून पक्ष आमचाच असा दावा केला जात आहे. आता हे संपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टातही गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची? असा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे सामान्य माणसाला माहित आहे... असे विधान केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार हे आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात सहभागी झाले. या वेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच दर्शनही घेतले. नियोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघर्षाबद्दल हे महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी कोणाची याबद्द्ल बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यासाठी सामान्य माणसाचा विचार महत्वाचा आहे, असे म्हणत जनतेला खरी परिस्थिती माहीती आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? हे सामान्यांना माहिती आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

वाघनख्यांबद्दल वाद नको...

दरम्यान, सध्या शिवरायांच्या वाघनख्यांवरुन नवा वाद सुरू झाला आहे. लंडनमधून आणली जाणारी वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा काही इतिहासकारांसह राजकीय नेत्यांनी केला आहे. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले. मला याबद्दल काही ज्ञान नाही. मात्र वाघनख्यांबद्दल वाद नको.. असे शरद पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT