Ajit Pawar And Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट! शिंदेंच्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोठी मागणी

NCP Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे आठ मंत्रिपदांची मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच, राज्याच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागण्यांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही (अजित पवार) मंत्रिपदांचा आग्रह धरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडे राष्ट्रवादीने आठ मंत्रिपदांची मागणी केली आहे.

नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात आठ मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडे केली आहे, असे सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादी काँग्रेसला आठ कॅबिनेट मंत्रिपदे आणि काही राज्यमंत्रिपदेही मिळावीत, अशीही मागणी आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९ मंत्रिपदे होती. यंदा एखादे कॅबिनेट दर्जाचे पद सोडले तरी, राज्यमंत्रिपदे अधिक मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावांवर चर्चा झाल्याचे कळते. महायुती सरकारमध्ये किमान दहा ते बारा मंत्रिपदे मिळावीत अशी प्रमुख मागणी असल्याचे समजते. त्याचवेळी सुरुवातीला सात ते आठ मंत्री शपथ घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अजित पवार, आदिती तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक आणि मकरंद पाटील हे संभाव्य मंत्री शपथ घेऊ शकतात.

शिंदेंच्या शिवसेनेला हवंय गृहमंत्रिपद

महायुतीला जनतेचा कौल मिळाल्यानंतर सरकार लगेच स्थापन होईल, असे वाटत होते. पण दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार की, भाजपचा मुख्यमंत्री आणि तेही देवेंद्र फडणवीस होतील, अशी चर्चा होती. अखेर स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन त्या चर्चेला पूर्णविराम दिला.

भाजप आणि मोदी-शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. पण, शिवसेनेकडून गृहमंत्रिपदाची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारचा शपथविधी आणि महायुती सरकारमधील खातेवाटप रखडल्याचं बोललं जात आहे.

राजकीय घडामोडींना वेग

शपथविधी ५ डिसेंबरला होणार आहे. त्याआधी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. आज, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते गिरीश महाजन, शिवसेना नेते उदय सामंत यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचे कळते. महाजन महत्वाचा राजकीय संदेश घेऊन आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचवेळी शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी भेटीसंदर्भात माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांना भेटलो असून, त्यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT