MVA Seat Sharing  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला हव्यात 135 जागा, काँग्रेसचा प्रस्ताव ठाकरे-पवार मान्य करणार?

MVA Seat Allocation : मविआमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. त्याला कारणही तसंच आहे..काँग्रेसनं थेट 135 जागा लढवण्याचा प्रस्ताव ठाकरे आणि पवारांसमोर ठेवला आहे.

Tanmay Tillu

तन्मय टील्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

मविआमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. त्याला कारणही तसंच आहे..काँग्रेसनं थेट 135 जागा लढवण्याचा प्रस्ताव ठाकरे आणि पवारांसमोर ठेवलाय. आता ठाकरे-पवार त्यांचा हा प्रस्ताव मान्य करणार की काँग्रेसला आपला फॉर्म्युला बदलावा लागणार यावरचा हा रिपोर्ट...

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं आगामी विधानसभेसाठी कंबर कसलीये. काँग्रेसनं नुकताच 288 जागांचा सर्व्हे पूर्ण केला असून मविआच्या बैठकीत काँग्रेसनं मित्रपक्षांना 135 जागांचा प्रस्ताव दिलाय. याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सूचक विधान केलंय...हा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला जाणार आहे. त्यानंतर त्यातल्या किती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील हे स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसने नुकत्याच विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी केली होती. या जागांसाठी इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला होता. एका जागेसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरलेत. त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीत 135 जागा मिळाव्यात अशी मागणी काँग्रेसनं केलीये.

मात्र 153 जागा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप आणि अन्य छोटे पक्ष कसे वाटून घेणार का ? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लोकसभेला कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभेला पवार जागा वाटपात दोन पावलं मागे जाण्याची शक्यता कमीच आहे. तर ठाकरेंनाही पवारांपेक्षा कमी जागा मान्य होणं कठीण आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रस्तावावरून महायुतीत तिढा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT