अमर घटारे, प्रतिनिधी...
Maharashtra Politics: शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडून अमरावतीत 9 ऑगस्ट क्रांती दिनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. बच्चू कडू स्वतः सत्तेत सहभागी असताना आपल्याच सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) राज्य सरकारविरोधात मोर्चा काढणार आहेत. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी ९ तारखेला ऑगस्ट क्रांती दिनी विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे.
याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी "शेत मजुरांसाठी योजना नाहीत, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कंत्राटी कामगार, पेरणी ते कंपनी पर्यंतचे काम MREGS मधून व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करणार" असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, स्वतः बच्चू कडू सरकारमध्ये सहभागी असताना मोर्चा काढणार असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी "सत्तेत असून मोर्चा काढू नये अशी कुठे घटनेत आणि कायद्यात तरतूद नाही. आम्ही जेव्हा पाठींबा दिला तेव्हा पाठिंबा घेणाऱ्यानेही म्हटले नाही की सत्तेत असून मोर्चा काढू नये, असे काही बंधन नसते.." अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.