Thackeray group workers from Manmad join Shinde Sena in a symbolic political shift ahead of the municipal elections. saam tv
महाराष्ट्र

Nashik Politics: शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांनी सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश

Thackeray Sena Party Worker Join Shinde Group: मनमाडमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे, कारण महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पुनर्रचनांमध्ये ठाकरे गटाला हे पक्षांतर आणखी एक धक्का आहे.

Bharat Jadhav

  • मनमाडमधील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

  • नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • ठाकरे गटाची ताकद कमी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात.

एकीकडे बंधू राज ठाकरे सोबत आपल्याने आपली ताकद वाढल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. दोन्ही बंधूंमध्ये बैठक सत्र सुरू असून राजकीय चर्चा केली जात आहे. त्यावेळी मात्र राज्यातील इतर भागात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. ठाकरे गट फिनिक्स सारखी भरारी घेईल, अशी आशा वर्तवली जात असताना पक्षातील आऊटगोइंग सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय. मनमाड शहरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलाय.

शहरातील मंगलमूर्ती नगर भागातील ठाकरे गटाचे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी होत आहे. नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी हे पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे. नगर पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीच्या वाऱ्यात अनेक राजकीय पक्षांना कार्यकर्ते सोडून जाण्याचे धक्के बसत असतात. यात महाविकास आघाडीला सर्वाधिक धक्के बसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar: मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात; गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य चर्चेत, VIDEO

Eyebrow Care: जाड Eyebrows हव्यात? मग हे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं आरस्पानी सौंदर्य, साडीतील फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

Maharashtra Live News Update : जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

माजी पंतप्रधानांचा गायिकेसोबत किस करतानाचा फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ, कोणत्या देशात घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT