Mahayuti  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटप फॉर्म्युल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज? छगन भुजबळांनी केली 'ही' मागणी

Mahayuti Seat sharing Formula : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीची दोन फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठी उलथापालथ झाली आहे. महायुतीची ताकडे महाविकास आघाडीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र महायुतीची वाढलेली ताकद आगामी काळात त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. कारण जागावाटपासून तिन्ही पक्षांमध्ये रस्सेखेच होण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीची दोन फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत. पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ३२-१२-४ च्या जागावाटपावर महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे. यामध्ये भाजप ३२, शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी ४ जागावर लढेल अशी माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार  भाजप २८ जागा लढेल आणि शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १०-१० जागा लढतील, अशी चर्चा आहे. मात्र जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे.

महायुतीच्या जागावाटपाच्या या फॉर्म्युल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीची सूर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, याबाबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत मला अद्याप माहिती नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळव्यात ही आमची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

Lucky zodiac signs: कार्तिक शुक्ल अष्टमीचा शुभ संगम; या राशींसाठी धार्मिक कार्य, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाचे संकेत

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

SCROLL FOR NEXT