Maharashtra Politics 
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीत बिघाडी? दिल्ली दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट टाळली

Aditya Thackeray: ठाकरे गट शिवसेना नेते आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

Bharat Jadhav

दिल्लीतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव केला, त्यानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झालाय. आताठाकरे गटाच्या नेते शरद पवारांपासून दोन हात लांब राहात असल्याचं दिसत आहे. त्याच कारण म्हणजे दिल्ली दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीच थेट शरद पवार यांची भेट घेणं टाळलंय. एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता आदित्य ठाकरेंनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेणं टाळलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं म्हटलं जात आहे.

दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. मात्र शरद पवारही दिल्लीत आहेत, तरीही आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही. यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही ठीक आहे का नाही? असा प्रश्न केला जात आहे. दिल्ली आल्यानंतरही ठाकरेंनी शरद पवारांपासून दूर राहणं का पसंत केलं?

दरम्यान दिल्ली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्न यावेळी उपस्थित केले. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी सरहद या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिंदे यांचा सत्कार झाला होता. एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी शिंदेंची स्तुती केली होती, त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान शरद पवार हे साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीचे प्रमुख आहेत. यंदा हे साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत होणार आहे. परंतु शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. पवारांवर केलेल्या टीकेमुळे राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे सेनेच्या नेत्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार गटाच्या नेत्यांनीरी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. सांस्कृतीक कार्यक्रम असेल तेव्हा विरोधी पक्षातील नेते देखील तेथे जात असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं मत शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत्तरादाखल केलं मांडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT