Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole: मोठी बातमी! नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?

Congress Leader Nana Patole: नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. राज्यातील पराभव स्वीकारून नाना पटोले राजीनामा देणार आहेत.

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या पराभवाचा सर्व खापर नाना पटोले यांच्यावर फोडले जात आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. राज्यातील पराभव स्वीकारून नाना पटोले राजीनामा देणार आहेत. आज वरिष्ठांशी बोलून राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज नाना पटोलो दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक चांगली कामे केली होती. त्यानंतर त्यांच्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांना घवघवीत यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

विधानसभेत काँग्रेसला अपयश मिळाल्यामुळे अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नाना पटोले यांच्यावर दबाव होता. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी पक्षश्रेष्ठींना भेटून ते राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT