Nana Patole News Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole: काँग्रेसच्या पराभवानंतर नाना पटोलेंची दिल्लीवारी, हायकमांडची घेणार भेट

Maharashtra Assembly Election Result 2024: . विधानसभा निवडणुकी निकालामध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेते नाना पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

Priya More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीतचा दारुण पराभव केला. या निवडणुकीच्या निकाला महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघातील काँग्रेस पक्षाला मोठं अपयश आले. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे २० आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १६ आमदार तर काँग्रेसचे फक्त १० आमदार विजयी झाले.

काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसमधील नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली जाणार आहेत. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरती ते पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणूक निकालाच्या धक्कादायक निर्णयानंतर नाना पटोले यांची ही दिल्लीवारी असणार आहे. वरिष्ठांशी चर्चा करून आगामी रणनीती ठरवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

'दिल्लीला जाण्यापूर्वी नाना पाटोले यांनी सांगितले की, 'मी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे. हाय कमांडशी बोलणार आहे. भाजप विरुद्ध जनतेचा रोष असताना असे निकाल लागले आहेत. राज्यातील जनतेचा अमित शाह आणि आदित्योगी यांना विरोध होता. मोदींच्या सभेला गर्दी देखील नव्हती. एवढे असताना लोकांचा विरोध असताना एवढ्या प्रमाणात कसा बंपर निकाल आला. कुठे ना कुठे दाल मैं कुछ काला है.', असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

तसंच, 'लोकशाहीमध्ये जनता ही महत्वाची असते. पण हे जनतेच्या मताच सरकार नाही. आम्ही हायकमांडनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करू. नेमकं कारण काय गुपित काय हे बघू. आमच्याकडे सर्व रिपोर्ट होते त्यात जे हारणारे होते ते जिंकले.', असे मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT