Eknath Shinde And Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी प्रचार सभांचा धुरळा, मुख्यमंत्र्यांच्या ४८ तर शरद पवारांच्या ५५ सभा

Eknath Shinde And Sharad Pawar Rally: आपले सरकार यावे यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. सर्वच राजकीय नेते राज्यभर दौरे करत प्रचार करत आहेत. आपले सरकार यावे यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात ४८ सभा होणार आहेत. तर शरद पवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली आहे. शरद पवार यांच्या राज्यभरात ५५ सभा होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री राज्यभरात सभांची हाफ सेंन्चुरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील १२ दिवसांत राज्यभरामध्ये ४८ सभा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसाला ४ सभांचे वेळापत्र मुख्यमंत्र्यांचे आखण्यात आले आहे. या १२ दिवसांत महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात या सभा होणार आहेत. मुंबईच्या अंधेरी पूर्व येथून मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडत सभांना सुरूवात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार शेवटची सभा ही मुंबई तसेच ठाण्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महायुतीप्रमाणे महाविकास आघाडी तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या प्रचाराचे कार्यक्रम आखले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी शरद पवारांनी प्रचारसभांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या राज्यभरामध्ये ५५ जाहीरसभा होणार आहेत. पुढील दोन आठवड्यात शरद पवार यांच्या ५५ सभांचं नियोजन करण्यात आलं आहे.

शरद पवार दिवसाला अंदाजे चार चे पाच सभा घेणार आहेत. शरद पवार ४५ मतदार संघात ५५ प्रचारसभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीही शरद पवार यांनी ८० पेक्षा जास्त प्रचारसभा घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी १० पैकी ८ खासदार निवडून आणले होते. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे ८८ उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT