Shrinivas Vanga Wife  Saam Tv
महाराष्ट्र

Shrinivas Vanga: ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले, कुटुंबीयांशी नेमकी काय चर्चा झाली?

Palghar Assembly Election 2024: श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर ते आज पहाटे घरी आले पण ते परत निघून गेले.

Priya More

रुपेश पाटील, पालघ

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा ३६ तासांनंतर घरी परतले. पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि घर सोडून निघन गेले होते. तब्बल ३६ तासांपासून त्यांचे दोन्ही फोन नॉटरिचेबल होते. श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. आज पहाटे ३ च्या सुमारास ते घर आले आणि कुटुंबीयांना भेटून परत निघून गेले. घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी नेमकी काय चर्चा झाली याची माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.

श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले की, 'टेन्शनमुळे ते निघून गेले होते. आम्ही शोध घेतल्यानंतर ते रात्री घरी आले. तब्येत बरी नसल्यामुळे ते नातेवाईकांकडे गेले होते. ते परत घरी येतील. त्यांना आम्ही समजावल्यानंतर ते घरी आले. कोणत्याही राजकीय नेत्यांशी त्यांचे काहीच बोलने झाले नाही. मुख्यमंत्री त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते घरामध्ये फक्त अर्धातास थांबले आणि परत गेले.'

आपल्या पुनर्वसनाच्या चिंतेमुळे ३६ तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा हे घरी आले आणि त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेले. विश्वास ठेवलेला एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यतीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी गेल्याचीमाहिती समोर आली आहे .

नॉट रिचेबल असलेले वनगा कुटुंबीयांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. यामुळे वनगा कुटुंबियांची आणि पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे. मात्र घरी परतलेले वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेलं नाही. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Benefits: नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

South Indian Rice Dishes: तुम्हाला साउथ इंडियन डिशमधले १० वेगवेगळ्या पद्धतीचे राईस माहीत आहेत ?

Maharashtra News Live Updates: अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज बाद झाल्याची अफवा; फहाद अहमद यांनी केले गंभीर आरोप

Jalgaon News : वडील घराला कडी लावून निघाले अन्‌ घात झाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

Nandurbar Politics: महायुतीला धक्का, नंदुरबारमध्ये हिना गावित यांची बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT