Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवार राज्यात उडवणार प्रचाराचा धुरळा, ५० सभा, पश्चिम महाराष्ट्रावर फोकस, बारामतीत सांगता

Sharad Pawar Maharashtra Rally: विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ५० सभा घेणार आहेत. १८ नोव्हेंबरला ते प्रचारसभांची सांगता करणार आहेत.

Priya More

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरलेत. अवघ्या ११ दिवसांत राज्यभर त्यांच्या ४२ सभा होणार आहेत. दररोज ४ सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. मविआच्या संयुक्त प्रचार दौऱ्यातही ते सहभागी होणार आहेत. शरद पवारांच्या सर्वाधिक सभा या पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याने अजित पवारांची चिंता वाढणार आहे. शरद पवारांनी ८७ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. सर्वच ठिकाणी शरद पवारांना जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे निवडक मतदारसंघांत सभांचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ उमेदवार उभे केलेत. उत्तर महाराष्ट्रात १८, मराठवाड्यात १५, विदर्भात १२ आणि मुंबई कोकण विभागात ११ मतदारसंघांत शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत.

विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ५० सभा घेणार आहेत. १८ नोव्हेंबरला प्रचाराची सांगता सभा ही बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी घेणार आहेत. आज शरद पवार यांच्या ४ सभा होणार आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आज शरद पवार यांची परळीत सभा होणार आहे. शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात उतरणार आहेत. परळीमध्ये राजेसाहेब देशमुख,आष्टीमध्ये मेहबूब शेख, बीडमध्ये संदीप क्षीरसागर या उमेदवारांसाठी शरद पवार यांची प्रचार सभा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT