Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मिशन 45+ अंतर्गत महायुती लागली कामाला, नाशिकमध्ये तिन्ही पक्षांची एकत्र बैठक

Maharashtra Politics: राज्यात लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी महायुती कामाला लागली असून मिशन 45+ अंतर्गत नाशिकमध्ये बैठक होत आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे.

Sandeep Gawade

तबरेज शेख

Maharashtra Politics

राज्यात लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी महायुती कामाला लागली असून मिशन 45+ अंतर्गत नाशिकमध्ये बैठक होत आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे. या बैठकीला भाजप, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट ) प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार गोडसे, भाजप आमदार फरांदे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष तसंच प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. स्थानिक पातळीवर तीनही पक्षाची एकत्रित बैठक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपसह महायुतीतील पक्ष कामाला लागताना दिसत आहेत. भाजप यावेळी लोकसभेसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल असा दावा केला होता. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून बावनकुळे महाविजय २०२४ संकल्प यात्रेंतर्गत राज्याचा दौरा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जागावाटपासाठीही चर्चा सुरू असून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज नाशिकमध्ये बैठक होत असून या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Maharashtra weather: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुणे-साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना आज येलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

SCROLL FOR NEXT