Sanjay Raut Statement Over Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Statement Over Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी मंत्री पक्ष ठिकवणार नाहीत. शिंदे हे आधी मुख्यमंत्री पदाचा विचार करतील, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय.

Bharat Jadhav

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद घेणार की पक्ष हे विचारल तर ते मुख्यमंत्री पद घेतील. उद्या भाजपने एकनाथ शिंदेंना भाजपात पक्ष विलिन करायला लावला आणि त्या मोबदल्यात मुख्यमंत्री पद दिलं तर एकनाथ शिंदे हे लगेच भाजपमध्ये जातील असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलंय.

खासदार संजय राऊत हे साम टीव्हीच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना सोडून भाजपसोबत जाणाऱ्या शिंदे गटावर मोठा हल्लाबोल केला. शिंदे गटाचे नेते आणि खुद्द एकनाथ शिंदे हे हिंदूत्त्व आणि संजय राऊत यांच्यावर वारंवार टीका करतात. त्यावरून संजय राऊत यांना ब्लॅक अँण्ड व्हाईट या कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला. त्या उत्तर देताना संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केलंय.

एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार- संजय राऊत

शिंदे गट आणि एकनाथ शिंदे हे बाडगे आहेत. बाडगे हे नेहमी मोठ्यानं बाग देतात. मी जेथे आहे, तेथे मोठ्याने बाग देतो. मीच कट्टर आहे हे असं म्हणतात. शिंदे गटाकडून तशीच बतावणी केली जाते. एकनाथ शिंदे याचा गट हा भाजपमध्ये विलीन झालाय. त्यांची विधाने त्याच पद्धतीची केली जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यांनी पक्ष विलीन केला नव्हता. पण एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आहेत, ते जवळपास भाजपमध्ये विलीन झाले होते.

जर एकनाथ शिंदेंना भाजपने ऑफर दिली की, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देतो, पण तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा. तर ते एका मिनिटाचा विचार न करता भाजपमध्ये सामील होतील. पण ते असं म्हणणार नाही की शिवसेना हे नाव मला अमित शाह यांनी दिलंय. त्या नावाला मी जागतो.

ते जरी चोरीचं नाव असलं तरी मी माझी शिवसेना ठिकवेन, असं ते शिंदे म्हणणार नाहीत. ते लागलीच भाजपमध्ये जातील. कारण त्यांना पद महत्त्वाचं आहे. आधी मुख्यमंत्री पद नंतर शिवसेना पक्षाचा ते विचार करतील, असं विधान संजय राऊत यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suresh Borse Death : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, संभाजीनगरमध्ये खळबळ

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! २ कोटींचे ड्रग्स जप्त; दोघांना बेड्या

Heart Attack: हार्ट अटॅक येणारे हे लवकर कसं ओळखाल? 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये दाखल, आंदोलनाला सुरुवात

पैशांची चणचण दूर करेल पिवळ्या चपातीचा 'हा' सोपा उपाय, महिनाभरातच व्हाल धनवान

SCROLL FOR NEXT