Bhiwandi Municipal Mayor News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

Bhiwandi Municipal Mayor News : भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत बहुमतासाठी चुरस वाढली आहे. भाजपमधील नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती. विलास पाटील प्रकरणानंतर राजकारण तापले.

Alisha Khedekar

  • भिवंडी महापालिकेत महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेत चुरस वाढली आहे

  • भाजपमधील नाराज नगरसेवकांवर शिवसेनेची नजर

  • विलास पाटील प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले

  • बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू

फैय्याज शेख, भिवंडी

राज्याच्या राजकारणात सध्या विविध हालचाली होताना पाहायला मिळतं आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून फोडाफोडीचे सत्र पाहायला मिळते आहे. अनेक कार्यकर्त्यांनी स्वपक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेकडे सर्वात जास्त वाटचाल केली आहे. दरम्यान भाजपाकडे आणि शिवसेनेकडे तुलनेने संख्या बळ जास्त झालं आहे. अशात महापालिका निवडणुका होऊन बरेच दिवस उलटले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दरम्यान भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराज नगरसेवकांना शिवसेने कडून फोडण्याचे असल्याची माहिती समोर आली आहे.

भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोणार्क विकास आघाडीचे माझी महापौर विलास पाटील आणि भाजपमध्ये राडा झाला होता. या राड्यानंतर विलास पाटील यांना शिवसेनाने जवळ करून महापौर निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत असल्याने भाजपामध्ये तीव्र नाराजी आहे .

त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. तसेच बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये शर्यत लागली आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून भाजपला फोडण्याचे प्रयत्न सुरु असून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. दरम्यान भिवंडी महापालिकेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

भिवंडी महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज करण्यात आले. यामध्ये महापौर पदासाठी ९ तर उपमहापौर पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केले.यामध्ये राजकीय पक्षाच्या ५ जणांनी तर, इतर ४ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच उपमहापौर पदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यापैकी ४ जण राजकीय पक्ष वाले तर इतर पक्षाच्या २ जणांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे, काँग्रेसचे तारिक मोमिन यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्हीसाठी नामनिर्देशन दाखल केल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Organ Shutdown Timeline: मृत्यूनंतर सर्वात पहिला कोणता अवयव काम करणं बंद करतो? वाचा शरीरात कसे होतात बदल

Moong Dal Laddu Recipe : १०-१५ दिवस छान टिकतील असे मूग डाळीचे लाडू, जेवल्यानंतर खायला हेल्दी स्वीट डिश

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Bigg Boss Marathi 6 : 9 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; भाऊच्या धक्क्यावर कोण घेणार घराचा निरोप? 'हे' सदस्य Danger Zone मध्ये

Yoga Poses For Women Health: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी महिलांनी कोणता योगा करावा?

SCROLL FOR NEXT