Disha Salian Case Saam Digital
महाराष्ट्र

Disha Salian Case: दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंना बावनकुळेंनी दिला सल्ला, काय म्हणाले? जाणून घ्या

Disha Salian Case: राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार करून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

Sandeep Gawade

Disha Salian Case

एकनाथ शिंदे यांचं सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आकसापोटी कोणावरही कारवाई करणार नाहीत. राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार करून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरे यांना दिला आहे. त्याच बरोबर नुकताच पार पडलेल्या 5 राज्याच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असून मुख्यमंत्री कोण असावं या संदर्भात आदित्य ठाकरेंनी आम्हाला सल्ला देऊ नये, असं ते म्हणाले आहेत.

दिशा सालियान मृ्त्यू प्रकरणी शिंदे सरकार आदित्य ठाकरे यांची एसआयटी मार्फत चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्त्वात एसआयटी हे काम करणार आहे. दिशा सालियांन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी काही आमदारांकडून सातत्याने केली जात होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजपकडून आकसापोटी आणि बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जातात. अधिवेशन आलं की अशा पद्धतीने वातावरण निर्मिती केरण्याची त्यांची जुणी पद्धत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहलेलं पत्र ट्विट केल्याप्रकरणी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने फडवणीस यांचं याबाबत अभिनंदन केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उठून कुणीही बोलेल त्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. तर छगन भुजबळ यांच्या वक्तव्यापासून सरकार अडचणीत येणार नाही. माध्यमांवर सतत चमकत राहण्यासाठी काही लोक काहीही विधान करत असतात म्हणत त्यांनी नाना पटोले यांना टोला लगावलाय. तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी नितेश राणे बोलतील अस वक्तव्य करून बावनकुळे यांनी हसू पिकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mothers Day 2026: मदर्स डे निमित्त आईला कामातून द्या ब्रेक आणि पाहा 'हे' खास चित्रपट

EPFO Update: १२ वर्षांनंतर ईपीएफचे नियम बदलणार; पगार आणि पेन्शनवर होणार मोठा परिणाम, कोणते होणार बदल?

Taak Vs Lassi Benefits: ताक की लस्सी, उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी काय प्यावे?

२९ व्या वर्षी थेट मंत्री! थलापती विजय यांचा मोठा निर्णय; एस. किर्तना यांच्या नावाची चर्चा

Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, वटवाघळात ‘क्लेड बी’ विषाणूचा शोध

SCROLL FOR NEXT