Sanjay Raut on NCP SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut on NCP: राष्ट्रवादीत बदलाचा महाविकास आघाडीवर परिणाम? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut on NCP: राष्ट्रवादीतील या बदलाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Jagtap

Sanjay Raut Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारी अध्यपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील या बदलाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्यांच्या पक्षाला 25 वर्षे पूर्ण झाली. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली, तेव्हा आम्ही तो सोहळा पहिला होता. तो सोहळा आम्हाला आजही आठवतोय, ती एक ऐतिहासिक घटना होती. त्या पक्षात आज जर नवीन घडामोडी घडत असतील तर त्यावर आम्ही का बोलावं? शरद पवार (Sharad Pawar) त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जर पक्षात कोणावर जबाबदाऱ्या दिल्या असतील तर त्यावर आम्ही का बोलावं. त्या पक्षाचा आज वर्धापन दिवस आहे, त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.

महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार?

राष्ट्रवादी पक्षातील बदलांचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत घडामोडींवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. महाविकास आघाडी ही व्यक्तींपासून बनली नाही, तर राजकीय पक्षांपासून बनली आहे, असे राऊत म्हणाले.

अजित पवार समर्थ आहेत - राऊत

अजित पवार यांच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर ते स्वतः बोलतील, बाहेरच्यांनी का बोलावं. त्यांचं वकिलपक्ष त्यांनी कुणाला दिलंय का मला माहित नाही. भाजपला दिलंय का किंवा आम्हाला दिलंय का? तर नाही. त्यांचे ते समर्थ आहेत. अजित पवार हे त्यांच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षनेते देखील आहेत. ही पदे महत्वाची आहेत असे राऊत म्हणाले. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ही मोठी घोषणा केली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Latest Political News)

सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर प्रफुल पटेल यांच्याकडे गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांच्याकडे सध्या तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT