Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार? राज्यातील मोठा नेता सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत

Maharashtra Political News : राज्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसचे परभणी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार सुरेश वरपूडकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Yash Shirke

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. लवकरच निवडणुका जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोंडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काँग्रसचे परभणी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार सुरेश वरपूडकर काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सुरेश वरपूडकर यांनी मुंबईमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीमुळे त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा खऱ्या असल्याचे म्हटले जात आहे. पण याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सुरेश वरपूडकर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा परभणीमध्ये सुरु आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश वरपूडकर यांच्यामध्ये मुंबईत जी भेट झाली, त्या भेटीदरम्यान परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपाचे परभणीचे जिल्हाप्रमुख सुरेश भुमरे आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हजर असल्याची माहिती समोर आली आहे.

पक्षांतराच्या चर्चा सुरु असताना सुरेश वरपूडकर हे २२ जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तर यामुळे परभणीच्या काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेसचा जिल्हाप्रमुख भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांच्यासोबत पदाधिकारी, अनेक कार्यकर्तेही काँग्रेसमधून बाहेर पडतील. त्यामुळे सुरेश वरपूडकर यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT