Eknath Shinde News Saamtv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परदेशात क्रेझ! जगप्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकले फोटो

CM Eknath Shinde Photo On New York Time Square: टाईम्स स्क्वेअरवर फोटो झळकलेले एकनाथ शिंदे हे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

सुरज सावंत

CM Eknath Shinde On Times Square: शिवसेनेत (Shivsena) बंड करुन ४० आमदारांसह बाहेर पडत मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वत्र एकनाथ शिंदे हे नाव चर्चेत आले होते. तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रेझ चांगलीच वाढल्याचे दिसत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची क्रेझ फक्त ठाण्या महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. तर ही क्रेझ आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. नुकताच न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो झळकला आहे. (Maharashtra Politics News)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकवण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल यांनी हा उपक्रम राबवला.

काही दिवसांपूर्वीच राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. न्यूयॉर्क टाईम स्क्वेअरवर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे टाईम्स स्क्वेअरवर फोटो झळकलेले एकनाथ शिंदे हे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

कोण आहेत राहुल कनाल...

राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय मानले जायचे. काही दिवसांपूर्वीच राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला होता. ज्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, धावत्या ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

Kothimbir Vadi Tips: कोथिंबीर वडी नरम होते, आतून कच्ची राहतेय? मग वापरा ही एक ट्रिक, खमंग कुरकरीत होतील वड्या

Pune Tourism : हिरवेगार डोंगर अन् पांढरे शुभ्र धबधबे; पुण्याजवळील निसर्गरम्य ठिकाण, हिवाळी ट्रिपसाठी बेस्ट

Bigg Boss 19 : हीच सून हवी! "तू २६ चा, ती २१ ची"; कुनिकानं ठरवलं मुलाचं लग्न,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT