Sharad Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Sharad Pawar faction suffers setback: सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. भाजपने मोठी खेळी करत बड्या नेत्याला फोडलं.

Priya More
  • सोलापूरमध्ये भाजपची मोठी खेळी करत शरद पवारांना धक्का दिला

  • अकलूज बाजार समितीचे उपसभापती बापूराव पांढरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

  • धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

  • शिक्षक पदवीधर निवडणुकीपूर्वी सोलापूरमध्ये ही मोठी राजकीय घडामोड घडली

भरत नागणे, सोलापूर

सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. ऐन शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपने मोठा धक्का दिला. भाजपने मोठी खेळी करत या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला फोडलं. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीने भाजपचा झेंडा हाती घेतला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव पांढरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बापूराव पांढरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बापूराव पांढरे यांच्या भाजप प्रवेशाने माजी आमदार राम सातपुते यांची ताकद चांगलीच वाढली आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सत्ताधारी महायुतीबरोबर प्रचारात फिरत आहेत. करमाळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुतीच्या मेळाव्यात दिसले. तर दुसरकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तमराव जानकर, शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. तर माढ्याचे आमदर अभिजीत पाटील हे देखील गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे संतप्त झाले. त्यांनी यावरून संताप व्यक्त केला आणि आमदारांचे भरसभेत कान टोचले. लोकांनी शरद पवारांकडे पाहून मदतान केले तुम्ही दुसऱ्यांच्या दारात जाऊन लाचारी पत्करू नका, असा टोला त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांना लगावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

Wednesday Horoscope : बुधवारी नशिबाची साथ, अडकलेली कामे होणार पूर्ण; कोणत्या राशींना मिळणार धनलाभ?

SCROLL FOR NEXT