Maharashtra Politics x
महाराष्ट्र

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे. भाजपमधील एकनिष्ठ नेत्याने पक्षातून बाहेर पडत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • शिंदेंचा फडणवीसांना धक्का.

  • बड्या नेत्याने भाजप पक्ष सोडला.

  • कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेमध्ये प्रवेश.

Maharashtra Political News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच पार पडतील. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पूर्वी राज्यात अनेक ठिकाणी इनकमिंग आणि आउटगोईंग होत आहे. पक्षांतरामुळे पक्षाला आणि नेत्यांना धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला खिंडार पडल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. अंतर्गत राजकारणामुळे भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाश चित्ते यांचा शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे. २०० कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चित्ते यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

श्रीरामपूर तालुक्यामध्ये भाजपमध्ये पक्षांतर्गत राजकारण सुरु आहे. पक्षात सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे प्रकाश चित्ते यांनी भाजप सोडली अशा चर्चा रंगल्या आहेत. आज (१९ ऑक्टोबर) ठाणे येथे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झाले. चित्ते यांच्यासह माजी नगरसेवक किरण लुनीया, संजय पांडे, बबन मुठे,सोमनाथ कदम यांसारख्या २०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यातील भोकरदन येथे महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू तर चौघेजण जखमी

Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Turmeric Milk Benefits : रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

Rahul Gandhi Video: पूरी दाल ही काली है...राहुल गांधींची मोठी घोषणा; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार

भाजपच्या दिग्गज युवा नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT