Maharashtra Politics SAAM Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आमदारांवर टांगती तलवार, भाजप-संघाकडून आमदारांचा सर्व्हे

BJP Maharashtra MLA : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघाकडून सर्व्हे केला जाणार आहे. या सर्व्हेच्या आधारे उमेदवारी दिली जाणार असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.

Tanmay Tillu

तुन्मय टील्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघाकडून सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती आहे...या सर्व्हेच्या आधारे उमेदवारी दिली जाणार असल्याचं समजतंय...त्यामुळे भाजप आणि संघाच्या सर्व्हेमुळे भाजप आमदारांवर टांगती तलवार कायम आहे....त्यावरचा हा रिपोर्ट.....

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्वतःच्या आमदारांसाठी अंतर्गत सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये संघ सुद्धा सक्रिय झालाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान आमदारांना सर्व्हेला तोंड द्यावं लागणार आहे. सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांची तिकीटं कापली जाणार आहेत. त्यामुळे आमदारांवर टांगती तलवार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सर्व्हे दाखवून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. आता हाच पॅटर्न भाजपच्या विद्यमान आमदारासाठी राबवण्यात येणार आहे. याआधीही एक सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांना कामगिरी सुधारण्याची तंबी देण्यात आली होती.

भाजप आणि संघाचा सर्व्हे भाजपच्या विद्यमान आमदारांचे भवितव्य ठरवणार आहे.या सर्व्हेनंतर विद्यमान आमदारांमध्ये कोणाला उमदेवारी द्यायची आणि कोणाचा पत्ता कापायचा यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आता सर्व्हेची धास्ती घेतलीये.

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी जागा वाटपावरून अजूनही तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. त्यात संघानं विधानसभेची सुत्र हाती घेतल्याचीही माहिती समोर आलीये. त्यामुळे संघाच्या कसोटीवर आमदारांचा निभाव लागणार का हा प्रश्न आहे..तर दुसरीकडे जागावाटपामध्ये समाधानकारक जागा वाट्याला न आल्यास या तिन्ही पक्षांमध्ये बंडखोरी अटळ आहे. त्यामुळेच आमदारांची दुहेरी कोंडी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT