धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का
उद्धव ठाकरे गटाच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
कळंब नगरपालिकेतील गटनेत्यासह १० नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा भाजप प्रवेश
धाराशिवमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने मोठी खेळी करत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्यासह सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यां्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
धाराशिव जिल्ह्यात भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटलांनी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरला मोठा धक्का दिला. कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे या सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. त्यामुळे धाराशिवमध्ये भाजपची ताकद वाढली.
आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी सांगितले की, 'हे सर्व नगरसेवक आमचे जुनेच सहकारी आहेत. कळंबचा विकास करण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा कोणालाच धक्का नसून कळंब आणि धाराशिव जिल्ह्याला होणारा फायदा आहे. जसे ओम आणि कैलास हे माझे जुने सहकारी आहेत तसेच आता प्रवेश करणारे नागसेवक हे देखील माझे जुनेच सहकारी आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करतोय याला 'ऑपरेशन लोटस - ऑपरेशन टायगर' असं म्हणण्याचे कारण नाही. '
तसंच, 'भाजपमध्ये गटतट असा प्रश्न नसतो. बसवराज पाटील हे जेष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याकडे लातूरची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण मिळत नाही असे नाही मात्र मी त्यावेळेस उपलब्ध नसेल म्हणून गेलो नसेल. ते बोलावत नाहीत किंवा मी बोलावत नाही असे कांही नाही. जसे सरनाईक साहेब म्हणाले ऑपरेशन टायगर आणि आमचं लोटस ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.', असे राणा जगजीतसिंह पाटलांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.