Jai Prakash Mundada joins Shiv Sena Eknath Shinde faction Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणूक संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूक संपताच शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय.

Satish Daud

लोकसभेची निवडणूक संपताच शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडलाय. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंदडा यांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जयप्रकाश मुंदडा हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून आले होते. ते माजी सहकार राज्यमंत्री देखील होते. त्यांची हिंगोलीत मोठी ताकद आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंदडा हे नाराज होते. आपल्याला पक्षात डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझं ऐकून न घेतल्याचं मुंडदा म्हणाले. इतकंच नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) यांनी देखील आपल्याला विश्वासात घेतलं नाही. तसेच परस्पर उमेदवार जाहीर केला, अशी नाराजी मुंदडा यांनी बोलून दाखवली.

पक्षात कुणीही आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याने शेवटी कंटाळून मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं मुंडदा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जयप्रकाश मुंडदा यांनी पक्षात प्रवेश केल्याने हिंगोलीत शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. मुंदडा यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT