BJP leader Durgesh Bagul joins Eknath Shinde Shiv Sena saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते दुर्गेश बागुल यांनी पक्षाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला.

Bharat Jadhav

  • कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.

  • भाजप नेते दुर्गेश बागुल यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

  • बागुल यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला.

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना घेतलेल्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले दुर्गेश बागुल यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.

डोंबिवलीतील जोंधळे हॉलमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बागुल यांच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमधील वाद चव्हाट्यावर

भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा बागुल यांनी केलाय. मराठी भाषेच्या मुद्द्यावर पक्षातील भूमिका मान्य नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. दुर्गेश बागुल यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मराठी अस्मितेचा मुद्दा ठरला वादाचा

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ‘ब्रिजभूषण सिंह यांना मी सलाम ठोकतो. त्यांनी एकच धक्का दिला. उत्तर प्रदेशमध्ये येऊन दाखव. राज ठाकरे गेले नाहीत, उत्तर भारतीय माणसाने दाखवून दिलं.’ परब यांच्या या टीकेनंतर बागुल यांनी नाराजी व्यक्त केली. ‘राज ठाकरेंवर टीका करा, मात्र परप्रांतीय नेत्यांचा आधार घेऊन मराठी अस्मितेला कमी लेखू नका, अशी भूमिका बागुल यांनी घेतली होती.

नंदू परब यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागायला हवी. माफी माझी नव्हे, तर 15 कोटी मराठी जनतेची मागायला हवी होती, अशी भूमिका मांडली. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून तो भावनेशी जोडलेला असल्याचेही त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paper Dosa Recipe : घरच्या घरी कुरकुरीत पेपर डोसा असा करा तयार; रेस्टॉरंटची चव विसराल!

Maharashtra News Live Update: चार वर्षात 17 हून अधिक मैदानं निवासी किंवा कर्मशिअल करण्यात आली - आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

Kaju Benefits: रोज ४ काजू खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला मिळणारे जबरदस्त ७ फायदे

Monday Horoscope : मानसिक ताण जाणवेल, शंकराच्या कृपेने अडथळे दूर होतील; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT