Bhaskar Jadhav’s possible exit from Thackeray group and entry into BJP sparks speculation after Fadnavis’s hint saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात? जाधव विरोधीपक्ष नेते की मंत्री होणार?

Bhaskar Jadhav Likely Quit Thackeray Group : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका सूचक वक्तव्यानं ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. त्यामुळे भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगलीय. फडणवीस नेमकं काय म्हणाले? जाधवांच्या एक्झिटची पुन्हा चर्चा का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Jadhav

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

विरोधकांनी अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार टाकत राज्य सरकारला त्यासदंर्भात पत्र पाठवलं. मात्र याचं पत्राचा आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांसंदर्भात एक सूचक वक्तव्य केलयं. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांचा आवर्जून उल्लेख का केला, याची चर्चा रंगलीय. तर दुसरीकडे सही का नव्हती याबद्दल भास्कर जाधव यांना विचारल्यावर त्यानी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय.

भास्कर जाधव आपण उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असल्याचं नेहमीच सांगतात. मात्र, दुसऱ्या बाजूला आपल्याला मंत्रि‍पदाच्या संधीपासून कसे वंचित ठेवण्यात आलं हे जाहीरपणे सांगून आपली नाराजीही उघडपणे मांडतात. एकूणच जाधवांचा नाराजीचा सूर पाहता ते ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहे. यावेळी थेट मुख्यमंत्र्यांनीच पत्रकार परिषदेत त्यांच्याबद्दल 'आत्मीयता' व्यक्त केल्याने ते भाजपच्या वाटेवर आहेत का असाही सवाल उपस्थित केला जातोय.

नाराज भास्कर जाधवांनी ठाकरेंची साथ सोडली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कोकणात आता ठाकरेंच्या सेनेचा लोकप्रतिनिधीच नसेल. त्यामुळे या अधिवेशनातच भास्कर जाधव एखादा मोठा निर्णय घेणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT