Maharashtra Politics Amit Shah-eknath Shinde Meeting Sparks Political Buzz saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Amit Shah and Eknath Shinde Meeting: अमित शहा यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेते एकाच कारमधून कार्यक्रमस्थळी गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

Bharat Jadhav

  • अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.

  • अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती

  • या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असलेल्या १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'बद्दल माहिती दिली. या परिषदेच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र त्यानंतर एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचं वादळ उठलंय.

हा फोटो आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या झालेल्या बैठकीचा. दोन्ही नेत्यांनी अर्धा तास बैठक चालली त्यानंतर ते दोघेही एका कार्यक्रमात जाण्यासाठी एकाच कारमध्ये गेले. त्यामुळे शिंदे आणि शहा यांच्यात काय खिचडी शिजतेय अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरूय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटोही समोर आलाय. यानंतर घडलेल्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्याचं झालं असं, मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा यांनी 'एशियाटिक सोसायटी'ला भेट देण्यापूर्वी 'सह्याद्री अतिथीगृहा'वर उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

या दोन्ही नेत्यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते एकाच गाडीतून 'एशियाटिक सोसायटी'मधील कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र पोहोचले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील थेट त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात काही वेगळी खिचडी शिजतेय का? त्या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती बाहेर आली नाहीये, मात्र तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

'एशियाटिक सोसायटी ज्ञान-परंपरेची मशाल पुढे नेणार - अमित शहा

'एशियाटिक सोसायटी'मधील एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, "एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत प्रवेश करत असताना विनय-जी यांनी नमूद केले की, या संस्थेला भेट देणारे मी पहिलेच गृहमंत्री आहे. मात्र, मी येथे गृहमंत्री या नात्याने आलेलो नाही; तर भारतीय ज्ञान-परंपरेच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्रवासातील एक सहभागी म्हणून मी येथे आलो आहे. माझा ठाम विश्वास आहे की, आगामी काळात 'एशियाटिक सोसायटी, मुंबई' या ज्ञान-परंपरेची मशाल पुढे नेण्याचे काम करेल आणि ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अन् शिंदेंचा दिल्ली दौरा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरूय. त्याबाबत हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होताच राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे दिल्ली दौरे वाढलेत. काही दिवसापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे दिल्ली गाठली होती. त्यावेळीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

आता शहा हे मुंबई दौऱ्यावर आलेत, यादरम्यान अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. दोन्ही नेत्यांची बैठक अर्धा तास चर्चा चालू होती. अमित शहा यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी दिवसापूर्वी खळबळजनक दावा केला होता. अमित शहा यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी त्याला नकार दिलाय, असा दावा राऊतांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगेंनी मुबंईमध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय

Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

Monday Horoscope: बाप्पा मोरया! गणेशोत्सव 'या' राशींसाठी घेऊन येणार भरभराट; अचानक धनलाभाची शक्यता

... अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, कारण काय?

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच केजरीवालांनी खेळला मोठा गेम; नव्या युतीनं वाढवली भाजपसह काँग्रेसची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT