Mohit Kamboj News Saam Tv
महाराष्ट्र

Mohit Kambhoj News: मोठी बातमी! भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द; CBI कडून क्लीन चीट

मोहित कंबोज भारतीय यांच्यावरील सर्व गुन्हे अखेर रद्द करण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

Mohit Kambhoj Clean Chit: भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kambhoj) यांच्याबद्दलची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे. ज्यामध्ये मोहित कंबोज भारतीय यांच्यावरील सर्व गुन्हे अखेर रद्द करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोहित कंबोज यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ज्यामधून त्यांना क्लिन चीट मिळाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते मोहित कंभोज यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध अनेक फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले होते. ज्याबद्दल महत्वाची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात आता CBI कडून मोहित कंबोज भारतीय यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

तसेच मोहित कंबोज यांच्यावर आता कोणतीही केस नसल्याचा मुंबई हायकोर्टाच्या स्पेशल CBI चा अहवालही सादर करून घेतला आहे. मोहित कंबोज यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या संबंधित बॅंकरनेही No Objection अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्यावर आता कोणतीही केस नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra Politics)

कोण आहेत मोहित कंबोज...

वर्षभरापूर्वी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर मोहित कंबोज चर्चेत आले होते. ते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला होता. ज्यानंतर चांगलाच वाद उभा राहिला होता... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT