Uddhav Thackeray latest News Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: दुसऱ्यांच्या आजारावर, कुटूंबावर बोलता; ही कोणती संस्कृती? ठाकरेंचा भाजपवर पलटवार

Udhav Thackeray Vs Devendra Fadanvis: उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हणत जोरदार टीका केली होती. त्यांच्या या विधानाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी...

Maharashtra Political News: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हणत जोरदार टीका केली होती. त्यांच्या या विधानाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाले उद्धव ठाकरे...

आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. "कलंक शब्द एवढा लागायला काय झालं. दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता तो कलंक नाही का? असे म्हणत भ्रष्टाचाराचा आरोप करुन त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसता कसा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच "दुसऱ्यांवर आरोप करताना विचार करता जा... असे म्हणत भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी सीबीआयच्या धाडी टाकून कुटूंबांच्या कुटूंबे कलंकित करता त्याच कायं? असे म्हणत तब्येतीवरुन, आजारावरुन बोलणारे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत;" असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा...

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) १ ऑगस्ट रोजी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळय़ानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. "आता शरद पवार यांच्यासोबत मंचावर बसणार आहात मग ७०,००० कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? " असा टोलाही त्यांनी लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT