Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; शिवसेना भवनातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Thackeray Group Shivsena Bhavan Member Joined Shinde Group: ठाकरे गटाकडे पाठ फिरवत कर्मचाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Political News: शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती आमदार, खासदारांपासून आता कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचली आहे. शिवसेना भवनातील काही कर्मचाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडसल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाकडे पाठ फिरवत कर्मचाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आमदार, खासदारांनी ठाकरेंना रामराम केल्यानंतर आता शिवसेना भवनातील कर्मचाऱ्यांचीही भर पडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी शिवसेना भवनात काम करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कर्मचारी कोणते कामकाज पाहायचे?

ठाकरे गटाकडे पाठ फिरवलेले चारही कर्मचारी लोगो, डिझाईनिंग तसेच सभेतील क्रिएटिव्ह अशी कामे पाहत होते. यासह इथल्या कॉल सेंटरमध्ये सातजण काम करत होते. यातील अमोल मटकर, अमित शिगवण यांच्यासह चौघांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. पक्षांतर्गत वरिष्ठांकडून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटांच्या देखील बैठका होत आहेत. अशात आतापर्यंत नेते मंडळी पक्ष बदलत होते. मात्र आता ठाकरे गटाच्या कर्मचाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Periods Tips: दिवसेंदिवस पाळी उशीरा येतेय? टेन्शन सोडा! हे नैसर्गिक उपाय एकदा करुन पाहाच

Crime News : जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पायावरून गाडी नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण

Akshaya Naik: मराठमोळ्या अक्षया नाईकचा ओटीटी डेब्यू; या वेब सिरिजमध्ये साकारली खास भूमिका

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

SCROLL FOR NEXT