Amit Shah  yandex
महाराष्ट्र

Ambadas Danve: अमित शहा हे 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन, शिवसेना ठाकरे गटाचा नेता भडकला

Ambadas Danve On Amit Shah: उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते असं म्हणणाऱ्या अमित शहा यांच्यावर अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खोचक टीका केली.

Priya More

'उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत.', असे वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. अमित शहा यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याकडून जोरदार टीका होत आहे. अशामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमित शहा यांच्यावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे नेते अस म्हणणारे अमित शहा हे देशातील 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला, वा रे वा? विरोधकांशी तुमचे असलेले बोलणे, वागणे, राजकीय दबाव टाकणे ही औरंगजेबी वृत्ती आज कोण पोसते आहे हे देश बघतो आहे.'

अंबादास दानवे यांनी अमित शहा यांना 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन असे म्हटले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, 'देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते. इथल्या मातीची, लोकांसाठी झगडणाऱ्या माणसांना काही तरी नावं ठेवायचे, घालून पाडून बोलायचे हा यांचा रटाळ अजेंडा लोकसभेत आपटी खाऊनही कायम आहे. राहिला प्रश्न संभाजीनगरचा... बेगडी समर्थकांनी जे २०१४-१९ दरम्यान केले नाही, ते आम्ही केले. ती चिकलठाणा विमानतळाच्या नावाची फाईल तुमच्या टेबलावर धूळखात पडली आहे.. तेवढं होतं का बघा!'

दरम्यान, 'औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत आहे. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो.', असे वक्तव्य करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT