Supriya Sule News Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule News: अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे रडल्या; 'त्या' फोटोत नेमकं काय पाहिलं

Maharashtra Political News: राजकारण असलं तरी भाऊ आणि बहिणीच्या नात्यात यामुळे फुट पडली आहे का? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत.

Ruchika Jadhav

Supriya Sule Emotional:

राज्याच्या राजकारणात सध्या पवार कुटुंब चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली असून अजित पवार सत्तेत सहभागी झालेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भावाबहिण्याच्या नात्याचे अनेक किस्से सातत्याने समोर येत आहेत. राजकारण असलं तरी भाऊ आणि बहिणीच्या नात्यात यामुळे फूट पडली आहे का? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. (Latest Marathi News)

अशात अजित पवारांविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर सुप्रिया सुळे भावूक झाल्यात. झी मराठीवरी खुपते तिथे गुपते या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. सुप्रिया सुळेंनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी अवधूत गुप्तेने त्यांना अजित पवारांविषयी एक प्रश्न विचारला. भावावर प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंचे डोळे पाण्याने बदबदले.

झी मराठी या वाहिनीवर १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता हा एपिसोड दाखवला जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर याचा प्रोमो समोर आलाय. हा प्रोमो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एकवेळ कुटुंबातील माणसं साथ सोडतील पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत. असं म्हणत अवधूत गुप्तेने सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला. यावेळी अजित पवारांच्या आठवणीने त्या रडत असल्याचं दिसत आहे.

अवधूत गुप्तेने नेमका काय प्रश्न विचारला आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली याची माहिती १७ सप्टेंबर रोजी एपिसोड पाहिल्यावरच मिळेल. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. राजकारणातील मोठमोठ्या नेत्यांनी या कार्यक्रमात आपली मने मोकळी केलीत. सध्या हा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाला असून सामान्य नागरिक देखील संपूर्ण एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT