uddhav thackeray and eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Breaking : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळाले

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे.

Vishal Gangurde

Shivsena shinde Group News: निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाला कोणतंही चिन्ह देण्यात आलं नाही. मात्र, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. तर उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशुल, उगवता सूर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली आहेत.

त्यामुळं शिंदे गटाचं गदा हे चिन्ह रद्द केलं जाणार आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सूर्य हे चिन्ह सादर केली होती ही चिन्ह सारखीच असल्यामुले ही चिन्ह रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

शिवसैनिकांनो पेटवा आयुष्याच्या मशाली : किशोरी पेडणेकर

उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाले, 'एक गाणं आहे, ते गाणं हे वेगळ आहे. काळरात्र होता होता, उष:काल झाला. अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली. पेटवा मशाली. आपल्याला शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे'.

'खरी लढाई पहिलाी जिंकली आहे. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून प्रत्येक घराघरात मशाल हे चिन्ह जे देवीच्या, देवदेवतांच्या ठिकाणी लावून उजेड केला जातो. ज्यांनी आपल्या पक्षात काळरात्र करण्याची ठरवली. तो उष:काल आता सुरू झाला आहे. आता पेटवा आयुष्याच्या मशाली आणि दाखवा ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे, असेही पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस गळणे, कोरडेपणा आणि फ्रिझीनेसचा त्रास होतोय? हे तेल नियमीत लावा मिळेल सॉफ्ट सिल्की केस

रायगड जिल्ह्यात सात तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Paneer Chilli Recipe: हॉटेल स्टाईल टेस्टी पनीर चिली बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

सावधान, मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे ! अतिमुसळधार पावसाचा इशारा; महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी

जून कोरडाच, जुलैमध्येही पावसाचा तोटा? पेरण्या रखडल्या, बळीराजा संकटात

SCROLL FOR NEXT