SHarad Pawar- Bacchu kAdu Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar-Bacchu Kadu : बच्चू कडू महाविकास आघाडीत सामील होणार? शरद पवारांसोबतच्या आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष

Maharashtra Political News : शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट आज होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची चर्चा होणार असल्याचंही बोललं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News :

आमदार बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू महायुतीत सहभागी होतात की काय अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

बच्चू कडू आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. बच्चू कडू यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही.

याबाबत बच्चू कडू यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशात बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट होणार आहे. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार यांचा आज अमरावती जिल्ह्यातील दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड होण्याची शक्य ता आहे. शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट आज होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची चर्चा होणार असल्याचंही बोललं जात आहे.

शरद पवार आज सकाळी 10 वाजता आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी येणार आहेत. बच्चू कडू यांच्या निवासस्थानाबाहेर शरद पवार यांच्या स्वागताच्या बॅनर देखील लागले आहे. बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीत सामील होण्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

चर्चांवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी असंकाही करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय घेणार नाही. शिंदे साहेब नसते तर कदाचित आम्ही निर्णय घेतला असता. आमच्या पक्षाचं कुठे भलं होतं, कुठे राजकीय अस्तित्व मजबू होईल तो आमचा सोबत राहिल, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT