Sharad Pawar News saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: पंढरपुरात राष्ट्रवादीचे भव्य शक्ती प्रदर्शन; शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी

NCP Show Of Strength: ढरपूर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शरद पवारांच्या स्वागताचे ठिकठिकाणी मोठ मोठे बॅनर लावण्यात आलेत.

Ruchika Jadhav

भरत नागणे

Maharashtra Political News:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात कार्यकर्त्यांचा मेळावा‌ होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाय पंढरपूर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शरद पवारांच्या स्वागताचे ठिकठिकाणी मोठ मोठे बॅनर लावण्यात आलेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सभागृहापर्यंत बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे.

त्यापूर्वी सकाळी माढा तालुक्यातील कापशी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहून शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी उध्दव ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी‌त प्रवेश होण्याची शक्यता आहे.

सध्या माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. मागील काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे दोन्ही मतदार संघात दौरे वाढले आहेत.

माढा लोकसभा मतदार संघातील माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे,करमाळ्याचेअपक्ष आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिपक साळुंखे, माळशिरसचे उत्तम जानकर, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील असे अनेक मातब्बर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कोणता नवा डाव टाकतात याकडेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT