Nashik Guardian Minister Saam Tv News
महाराष्ट्र

महाजनांचा राष्ट्रवादीला धोबीपछाड? नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच? कुंभमेळ्यासाठी थेट दिल्लीचा आदेश?

Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटलाय. दिल्लीच्या हस्तक्षेपामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून कुणी कुणाला धोबीपछाड दिलाय?

Prashant Patil

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे थेट दिल्लीनंच या तिढ्यात लक्ष घातलं. आणि थेट महायुतीच्या नेत्यांना आदेश देत नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याचं स्पष्ट केल्याचं सूत्रांचं म्हणणंय. त्यामुळे गिरीश महाजनच नाशिकच्या पालकमंत्रिपदी राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपला का नाशिकचं पालकमंत्रिपद का हवंय ते पाहूयात.

भाजपला का हवं नाशिकचं पालकमंत्रिपद?

नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा

केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळणार

कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती

कुंभमेळ्याचे भव्य नियोजन करण्याचा भाजपचा निर्णय

कुंभमेळ्यावर संपूर्ण वर्चस्व राखण्याची रणनीती

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्यात जमा असला तरी रायगडचा तिढा मात्र कायम आहे. यासाठी मात्र दिल्लीनं सावध पवित्रा घेत रायगडचा चेंडू एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात टोलवलाय. दोघांनी एकत्र बसून य़ाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता दादा आणि शिंदेंमध्ये कोण माघार घेणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Kolte: Bigg Boss 6 ची विजेती तन्वी कोलतेचं वय आणि शिक्षण किती?

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या काळ्या गाजराचा रस, घरी कसा बनवायचा? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: बदलापूर पूर्वमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

SCROLL FOR NEXT