Kiran Samant-ravindra Chavan  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, किरण सामंतांच्या स्टेटसने ट्विस्ट

Kiran Samant News : किरण सामंत यांच्या स्टेटसमध्ये या जागेवरचा ट्विस्ट आणखी वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मशाल चिन्हाचे स्टेट्स ठेऊन किरण सामंत यांनी राजकीय गोंधळ निर्माण केला होता.

अमोल कलये

Political News :

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. तर शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

भाजप या जागेवर आपला उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यानंतर किरण सामंत यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं की, 'मी किरण सामंत, रोकेगा कौन ?'

किरण सामंत यांच्या स्टेटसमध्ये या जागेवरचा ट्विस्ट आणखी वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मशाल चिन्हाचे स्टेट्स ठेऊन किरण सामंत यांनी राजकीय गोंधळ निर्माण केला होता.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी भाजपदेखील उत्सुक

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आपला उमेदवार देण्यासाठी भाजपदेखील उत्सुक आहे. भाजप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेकडून किरण सामंत तयारी करत असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT