Narayan Patil Saam Tv
महाराष्ट्र

सोलापुरात शिवसेनाला मोठा झटका; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील शिंदे गटात

शिवसेना आमदारांच्या बंडा नंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

भारत नागणे

सोलापूर - करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामुळे सोलापूर (Solpaur) जिल्ह्यात शिवसेनाला मोठा झटका बसला आहे. 2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुक लढविली होती.परंतू त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते शिवसेनेवर नाराज होते. शिवसेना आमदारांच्या बंडा नंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. नुकतेच मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे गटात गेले. त्यानंतर आता करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

शिंदे गटात सध्या ४७ आमदार गेले असल्याचे बोलले जात आहे. यात शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ९ आमदार आहेत. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा -

शिंदे गटातील शिवसेनेतील आमदार

एकनाथ शिंदे, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, सौ. यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत शिवसेनेच्या एकुण ३८ आमदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

अपक्ष आमदार कोण आहेत?

बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, सौ.मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, सौ. गीता जैन अपक्ष ९ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे गटाला ४७ आमदारांनी पाठिंबा दिल्याने आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ८ कॅबिनेट मंत्र्यांचा यात समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT