Ajit Pawar Birthday Banners Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Poltics : अजितदादा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, नाशिकमध्ये झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar Birthday Banners : नाशिक शहरात लागलेल्या बॅनर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय. अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आलाय.

Satish Daud

महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसांचे बॅनर्स लागले आहेत. अशातच नाशिक शहरात लागलेल्या बॅनर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय. अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आलाय.

विशेष बाब म्हणजे, संपूर्ण शहरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP News) स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे. यावरुन महायुतीत पुन्हा वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून महायुतीत सामील झालेले अजितदादा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे.

अजित पवार (Ajit Pawar Birthday) हे महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं अनेकांचं म्हणणे आहे. अजित पवार यांची प्रशासकीय यंत्रणेवर चांगलीच पकड असल्याने ते राज्याच्या कारभार व्यवस्थित सांभाळून शकतात, असा अनेकांचा सूर आहे.

विशेष बाब म्हणजे, वाढदिवसाच्या एक दिवसआधी म्हणजेच रविवारी पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी खास केक आणला होता.

या केकवर 'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...', असं लिहण्यात आलेलं होतं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी हा केक कापला. तसेच त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार देखील केला.

या अनोख्या शुभेच्छा संदेशाची रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली. आता सोमवारी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण नाशिक शहरात त्यांचे बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सवर छापण्यात आलेल्या भावी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेखामुळे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT