Sharad PAwar-Prafull Patel Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis: शरद पवार साहेबांचा 'आशीर्वाद' मिळाला का? भेटीनंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...

काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

Maharashtra Political Crisis: गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) पक्षात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रफूल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना भेटीचे कारण स्पष्ट केले. (Maharashtra Politics)

काय म्हणाले प्रफूल पटेल...

यावेळी बोलताना प्रफूल पटेल (Praful Patel) यांनी "काल रविवार असल्यामुळे अनेक आमदार गैरहजर होते. त्यामुळे अनेकांनी शरद पवार यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळेच पुन्हा शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगितले. आज विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे बर्‍यापैकी आमदार मुंबईला हजर होते. त्यामुळे या सगळ्यांनीही शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांना पुन्हा साद...

तसेच याबद्दल पुढे बोलताना "काल बोलल्याप्रमाणे आम्ही पक्ष संघटना मजबूत एकसंध राखण्यासाठी त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशी विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत.." असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीची टीका...

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटींवर महाविकास आघाडीनेही Mahavikas Aaghadi) नाराजी व्यक्त केली आहे. या भेटींमधून अजित पवार हे सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.. अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT